आयआयटी-बीएचयू सामूहिक बलात्कार प्रकरण : पोलिसांची निष्पक्षता आणि भाजपचं ‘चाल-चरित्र’, दोन्ही प्रश्नांच्या पिंजऱ्यात…
बीएचयूमधील विद्यार्थिनीसोबत झालेल्या अमानूष घटनेने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, भाजपसाठी ‘चाल-चरित्र’ आणि ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या केवळ घोषणा आहेत, बाकी काही नाही. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या ब्रिजभूषण शरणसिंगला वाचवणं आणि या सामूहिक बलात्काराच्या आरोपींना वाचवणं, या गोष्टी भाजपला आरोपांच्या पिंजऱ्यात उभं करतात.......